---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचे : निवडणूक आयोगाचा निर्णय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का मानला जात आहे

shinde claim shivsena jpg webp

अधिक माहिती अशी की, निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना हे नाव दिलं आहे. याचबरोबर पक्ष चिन्हही एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आले आहे.

---Advertisement---

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन महाराष्ट्रातल सर्वात मोठं राजकीय बंड केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आणि चिन्हावरून वाद निर्माण झाला होता. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष राहणार आहे.

2018 साली पक्षाच्या घटनेत झालेला बदल आयोगाला कळविण्यात आलेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत पक्षांतर्गत लोकशाही निकष बाळगण्यात आले होते. मात्र 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेले नाही. हे बद्दल लोकशाहीशी सुसंगत नाहीत असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---