जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । शास्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी पलासदळ, एरंडोल तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणारे व टेक्विप, भारत सरकार समर्थीत प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) अंतर्गत दिनांक 30 मार्च रोजी “राष्ट्रीय विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात भारतातील विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यात शिक्षकांची भूमिका, राष्ट्रीय शिक्षण, औदयोगिक सहकार्य, विद्याशाखा विकास, या सह अनेक शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा झाली व वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरानी अनमोल मार्गदर्शन केले. या ऑनलाईन चर्चासत्राचे उदघाट्न प्रा. डॉ. विवेक रेदासनी, असो. डीन व प्राचार्य, यशोदा फार्मसी महाविद्यालय, सातारा यांनी केले. तज्ज्ञ म्हणून प्रा. डॉ. एच. के. अभ्यंकर (कार्यकारी संचालक, केजी ग्रुप) प्रा. डॉ. एस. बी. देवसरकर (डीन, डीबाटु ) श्री. सतीश रानडे (वरिष्ठ उद्योग तज्ञ) व प्रा. डॉ. अजय व्ही. देशमुख (संचालक, भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे ) या मान्यवरांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व ओळख प्राचार्य डॉ. अमोल लांडगे (एस. एस. बी. टी. फार्मसी महाविद्यालय, बांभोरी), प्राचार्य डॉ. योगेश पवार (गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालय, जळगांव) व प्राचार्य डॉ. समीर गोयल (एस. व्ही. के. एम. फार्मसी महाविद्यालय, धुळे) यांनी केले. महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सदरील प्रशिक्षण शिबिरास ऑनलाईन उपस्थिती दिली.
या चर्चासत्रात सहभागी झाल्या बद्दल प्रा. करण गोरख पावरा यांना डॉ. एस. बी. देवसरकर व प्रा. डॉ. विजय शास्री यांनी प्रतीकात्मक प्रमाणपत्र प्रदान करून गौरवले. तसेच उपस्थित सर्व प्राध्यापकांना व्हर्चुअल इ-सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. राहुल बोरसे यांनी केले. या चर्चासत्राचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ. विजय एम. शास्री यांनी चर्चासत्राच्या शेवटी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक म्हणून उपप्राचार्य गोपीचंद भोई व प्राध्यापक राहुल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. चर्चासत्रात प्रा. हेमंत चौधरी, प्रा. महेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. सायली भाटीया, प्रा. अमृता चिंचोले, प्रा. जावेद शेख व जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदेले सह अनेक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.