शास्त्री फार्मसी कॉलेज तर्फे जागतिक फार्मसिस्ट दिन नावीन्यपणे साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज | २७ सप्टेंबर २०२१ | एरंडोल येथील शास्त्री फौंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्री महाविद्यालयात जेष्ठ फार्मासिस्ट यांनी कोविड काळात देशवासियांना दिलेल्या सेवेबद्दल सत्कार सेवा व समर्पण अभियान व जागतीक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. किशोर काळकर,महाराष्ट्र राज्य जन जाती क्षेत्र प्रमुख, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश परदेशी लोकनियुक्त नगराध्यक्ष एरंडोल यांनी भूषवले . कार्यक्रमाची सुरवात ऍड.किशोर काळकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून तर नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते धन्वंतरी व भारत माता पुजन करून झाली. सेवा व समपर्ण अभियानची प्रस्तावना डॉ . नरेंद्र ठाकूर , नगरसेवक संयोजक भाजप वैद्यकीय आघाडी एरंडोल यांनी केली तसेच जागतिक फार्मासिस्ट दिन कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा . डॉ . विजय शास्त्री संस्थापक अध्यक्ष , शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी,सहसंयोजक भाजप वैद्यकीय आघाडी ( फार्मसी ) एरंडोल यांनी केली .
याप्रसंगी जेष्ठ फार्मासिस्ट यांनी कोविड काळात देशवासियांना दिलेल्या सेवेबद्दल ऍड.किशोर काळकर,नगराध्यक्ष रमेश परदेशी , डॉ . नरेंद्र ठाकूर , प्रा . डॉ . विजय शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी अशोक चौधरी , माजी उपनगराध्यक्ष एरंडोल,रविंद्र महाजन माजी नगराध्यक्ष एरंडोल , जयश्री पाटील नगरसेविका एरंडोल , छाया दाभाडे माजी उपनगराध्यक्ष एरंडोल , एस.आर. पाटील, अजेंद्र पाटील,अमोल जाधव सरचिटणीस , एरंडोल भाजप , नगरसेवक ऍड . नितीन महाजन नगरसेवक एरंडोल , यांचीविशेष उपस्थिती होती .
कार्यक्रमा प्रसंगी ऍड. किशोर काळकर यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागात उच्च प्रतीचे फार्मसी महाविद्यालय सुरु केल्या बद्दल शास्त्री फौंडेशनचे आभार मानले . इतर पक्षीय लोकांनी कोरोना योद्धा म्हणून फार्मसीस्टच्या अविरत योगदाना कडे दुर्लक्ष केले . पण भाजप ने दुर्लक्षित फार्मासिस्टच्या योगदानाला पुरस्कृत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे असे प्रतिपादन केले.नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त करतांना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून फार्मसिस्टचे उल्लेखनीय काम केल्या बद्दल अभिनंदन केले . सदरील कार्यक्रमात कैलास न्याती , अध्यक्ष केमिस्ट असो . एरंडोल यांनी मनोगत व्यक्त करतांना ऑनलाईन फार्मसीचा मुद्दा उपस्थित केला . ऑनलाईन फार्मसी मुळे औषधींची गुणवत्ता खालावलेली आहे तसेच बऱ्याच औषधी ह्या मनुष्याच्या आरोग्यास घातक व व्यसन पुर्वक असुन त्याच्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले . कार्यक्रमाच्या शेवटी डॉ . विजय शास्त्री यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले.डॉ.सुयश पाटील , डॉ . किशोर पाटील , डॉ . अमोल बोरनारकर , डॉ . रश्मी ठाकूर , कर्तव्य बहुउद्देशीय संस्था , धरणगावचे अध्यक्ष व सामाजीक कार्यकर्ते सुनील चौधरी , कैलास न्याती , अध्यक्ष , एरंडोल केमिस्ट असो . मुकेश गुजराथी , अध्यक्ष पारोळा केमिस्ट असो मनीष लाड , अध्यक्ष धरणगांव केमिस्ट असो . यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
त्याच याप्रसंगी एरंडोल , धरणगाव , कासोदा , उत्राण , तळई , पारोळा येथील ३५ केमिस्टचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे कॉर्डिनेटर प्रा . राहुल बोरसे , प्रा . महेश पाटील , प्रा . हेमंत चौधरी , प्रा . करण पावरा , प्रा . अनिता पावरा , प्रा . भाग्यश्री नेरपगार , प्रा . वैशाली खैरनार , संस्थेचे पी . आर . ओ . शेखर बुंदेले , कार्यालयीन प्रमुख नाना पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.