---Advertisement---
मुक्ताईनगर गुन्हे

वनक्षेत्रातील कारवाईने खळबळ; दोन लाखाचे सागवान जप्त!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या लाकडी उद्योगाबाबत तसेच सागवान लाकडांच्या तस्करीबाबत गावातील महिला सरपंच यांनी वनविभागाला दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत 1 लाख 80 हजाराचे सागवान लाकुड व 3 मशीन जप्तीची कारवाई केली आहे. केलेल्या या कारवाईमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

taskari jpg webp webp


मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रातर्गत येणाऱ्या चारठाणा वनपरीमंडळातील मौजे वायला येथील हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील महिला सरपंच आरती राहुल इंगळे यांनी पुढे येत गावात सुरु असलेल्या लाकुड तस्करी आणि फर्निचर बनविणाऱ्या अवैध अड्ड्यांची लेखी तक्रार वनपरीक्षेत्र अधिकारी वडोदा वनक्षेत्र यांचेकडे केली होती. दरम्यान मिळालेल्या तक्रारीची दखल घेत वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी तातडीने पथक तयार करुन शनिवारी दुपारी वायला गावात धडकले.

---Advertisement---

सरपंच व वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान कोळी यांच्या समक्ष ‌गावात शोधमोहीम सुरू केली.दरम्यान गावठाण हद्दीतील नाल्यांमध्ये, उकिरडे,कुटाराच्या ढिगांत तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मोटाररुम ध्ये अडगडीच्या ठिकाणी लपवुन ठेवलेला बेवारस सागवानचे ३ घनमीटरचे २५० नग लाकुड आढळुन आले. तसेच लाकडी फर्निचर तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या ३ मशनरी साहित्यासह जप्त करण्यात आले.एकुण १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.


ठिकठिकाणी सापडलेला माल जमा करुन ट्रॅक्टरमध्ये भरतांना वनकर्मचारी यांची दमछाक झाली होती रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---