लोकसहभागातून ऑक्सिजन सिलेंडर उभारणीसाठी सावदा येथे बैठक संपन्न

एप्रिल 1, 2021 4:31 PM

सावदा व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला असून दररोज अनेक पेशंट निघजिल्ह्यातील जवळपास सर्व दवाखाने फुल आहेत अश्या वेळी ऑक्सिजनची ताततडीने आवश्यकता असलेल्या एखाद्या पेशन्टला अश्या वेळी ऑक्सिजन मिळावा नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होते

savada news

सध्या सावदा व परिसरातील सर्व पेशन्ट फैजपूर येथील न्हावी मार्गावरील जे,टी, महाजन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलला असलेल्या कोविड सेंटर ला उपचारा साठी भरती करण्यात येत आहे येथे मात्र अद्याप पर्यन्त ऑक्सीजनची व्यवस्था नसल्याने ऑक्सीजन आवश्यक असलेल्या पेशंटला भुसावळ किंवा जळगाव येथे न्यावे लागत होते अश्यावेळी पेशंट वा त्यांचे नातेवाईक यांचे मनोधैर्य खचत असे

Advertisements

परंतु सावदा व परिसरातील कोरोना पेशंट यांना आता ऑक्सीजन साठी त्रास होउनये म्हणून न्हावी येथेच ऑक्सजन ची व्यवस्था व्यवस्था व्हावी म्हणून लोकसहभागतून ती करावी यासाठी दी 1 रोजी येथील विश्रामगृह येथे परिसराची ओळख ज्या केळी मुळे होते ते सर्व केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी व ट्रांसपोर्टचालक यांची एक बैठक घेण्यात आली यात सर्व उपस्थित मान्यवर यांनी सदर सामाजिक कामा साठी सर्वानि सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले यावेळी, येथील ट्रांसपोर्ट चालक यूनियन यांनी 50 हजार रु, नरेंद्रसेठ नारखेड़े, यांनी 50 हजार, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी यानी 10 हजार रु, नगरसेवक गुड्डू सेठ यसनी 5 हजार रुपये अश्या देणग्या जाहिर केल्या

Advertisements

यांची होती उपस्थिती

यावेळी फैजपुर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, स्वामीनारायण गुरुकुल सावदा चे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी, प्रांताधिकारी कैलास कडलग, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, स.पो.नी. देवीदास इंगोले, नरेन्द्रभाऊ नारखेडे, नगरपालिका कार्यालय अधीक्षक सचिन चोळके तसेच केळी व्यापारी, ट्रांसपोर्ट चालक, व्यापारी, शेतकरी आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित संतगण यानी सध्या कोरोना सारखे आपत्तित खऱ्याअर्थाने मदतीची गरज असून अश्या वेळी केलेली मदतीचे महत्व मोठे असून यांचे पूण्य सर्वात मोठे असते असे प्रतिपादन केले, या कामास सुमारे 5 लाख रूपयांची आवश्यकता असून यामुळे सुमारे 50 ऑक्सीजनयुक्त खाटा उपलब्ध होऊन येथील रुग्णाना याचा मोठा दिलासा मिळणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now