जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१। भालेर गावाचे सुपुत्र राहुल सुनील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनायोद्धा मुकेश पाटील आणि त्यांचा मित्राकडून गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात आले. राहुल पाटील हे साध्य नंदुरबार रेल्वे विभागात कार्यरत आहेत.कोरोना योद्धा मुकेश पाटील आणि त्यांचा पूर्ण टीम ला कोरोना काळात एक पडद्या मागची भूमिका घेत अनेक प्रसंगी राहुल पाटील यांनी मदत केली. आज शहरातील बस स्टँड च्या परिसर ,रेल्वे स्टेशन चा परिसर हॉस्पिटल च्या आवारात जेवणाचे पाकिट वाटले .त्याचाच एक भाग म्हणून आज पाटील , विकास वाघ,श्रीराम राठोड ,करण मालकर या विद्यार्थ्यांनी जेवण वाटप करत राहुल पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.
Published On: ऑगस्ट 23, 2021 7:10 pm
---Advertisement---