रमजान महिन्यातील लोडशेडिंग बंद करा – भाजप
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. या कालावधीत लोडशेडिंग करू नये अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरणच्या कार्यकारी अभियंता निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुस्लीम बांधवांचा दि. ३ एप्रिल ते ३ मे या कालावधीत रमजान पवित्र सण आहे. या महिन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण करतात. या महिन्यांमध्ये उन्हाचा कडाका असल्याकारणामुळे या कालावधीत चालू असलेले लोडशेडिंग बंद करण्यात यावे अशी मागणी अल्पसंख्याक युवा मोर्चा तर्फे जिल्हा महानगराध्यक्ष अश्पाक शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देवून करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष इमरान खान, शरीफ खाटिक,सरचिटणीस शहीद शेख मजीत, राजू देशमुख, गौरव भय्या, सलमान तडवी, साहिल तडवी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.