मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मोदींच सांत्वन: अहमदाबादला होणार रवाना
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी दुःखद निधन झालं.यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी यांची भेट घेण्यासाठी आता गुजरातला जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज सकाळी साडे तीनच्या सुमारास निधन झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आपल्या आईवर अंत्यसंस्कार झाल्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं काम सुरू केलं आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांच्या सांत्वनासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर शिंदे अहमदाबादसाठी निघणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कामकाजाला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनचं त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं.