बातम्या
मारुळात समाज मंदीराचे भुमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील मारुळ येथे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत समाज मंदिराचे सरपंच सैयद असद अहमद जावेद अहमद यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सलामत अली सय्यद व मारूळ गावचे पोलीस पाटील नरेश मासोळे हे उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे नेते व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जावेद अहमद सय्यद यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी अली सैयद ग्राम रोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळू तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण हातकर, कालू कौतिक तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर तायडे, तुकाराम तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू भास्कर तायडे, निळे निशान, सामाजिक संघटनेचे संजय तायडे, युवराज धनु इंगळे व सर्व बौद्ध पंचमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.