माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सावदा पालिकेचा तृतीय क्रमांक
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जुन २०२१ ते 20 डिसेंबर 2021 ह्या कालावधीत झालेल्या विविध कामाच्या मुल्यांकनवर आधारित नाशिक विभागात नगर परिषद क्षेत्रात सावदा नगरपालिकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात घ्यावयाच्या छोट्या कृती/ बदल सुचवतात. या छोट्या कृती/ बदल जर दररोज योग्यरित्या आणि सरावाने घेतले गेले तर ते पर्यावरणात बदल घडवून आणण्यासाठी एकत्रित होऊ शकतात. बंदी असलेल्या प्लास्टीक वस्तु व पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन केले तसेच सिंगल युज प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषद करीत असलेल्या उपाययोजना अंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे व सायकल, इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने सदरील क्रमवारी टिकवून ठेवणे जास्त अवघड असून ज्या घटकामधे कमी गुण प्राप्त झालेले आहेत त्यावर अधिकाधिक भर देऊन क्रमवारी उंचावन्याचा प्रयत्न केला जाइल असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामाध्यमातून जनजागरण करण्यात आले व यासर्वांची मूल्याकन आधारित दखल नाशिक विभागात घेऊन सावदा पालिकेस माझी वसुंधरा अभियान नाशिक विभागात तृतीय क्रमांक मिळाला, तसेच यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व नागरिक यांचे आभार देखील मानले.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला..