जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । उन्हाळा आला की थंड पेयं पिण्याचा मोह सर्वांनाच होतो. त्यात ज्यूस म्हटलं तर सर्वांचाच आवडता पदार्थ. संत्री, मोसंबी, सफरचंद, अननस, लिंबू, जंजिरा विविध प्रकारच्या ज्यूस शहरात उपलब्ध आहेत.
मात्र आता सध्या जुसचा थंडावा महागला असून मोसंबी ज्यूस ३० रुपये आणि अननस जूस ४० रुपये ग्लासने विकला जात आहे. याचे कारण म्हणजे फळांचे वाढलेले भाव. फळांचे वाढलेले दर व मालवाहतुकीसाठी द्यावे लागणारे अधिकचे भाडे या कारणांमुळे शहरातील ज्यूसचे दर वाढले आहेत.
गेल्या वर्षी लिंबू सरबत पिण्यासाठी दहा रुपये मोजावे लागायचे तर आता त्यासाठीच पंधरा रुपये मोजावे लागत आहेत तर मोसंबी आणि अनसाचे भाव देखील वाढल्यामुळे याचे दरही वाढले आहेत.