जळगाव जिल्हाजळगाव शहर

बोढरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी- उत्तम राठोड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चाळीसजळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । तालुक्यातील बोढरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शेतकरी विकास पॅनलचे उत्तम राठोड तर व्हाइस चेअरमन म्हणून सुमनबाई राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदर निवड निवडणूक अधिकारी देव यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आली आहे.

तालुक्यातील बोढरे विविध कार्यकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुक प्रकिया २७ मार्च रोजी पार पडली. यात शेतकरी विकास पॅनलने प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलचे धुवा उडवत सर्वच्या सर्व १२ जागांवर विजय मिळविला होता. यामुळे शेतकरी विकास पॅनलला एकहाती सत्ता प्रस्थापित करता आली. त्याअनुषंगाने शुक्रवार, ८ एप्रिल २०२२ रोजी चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीबाबत प्रकिया निवडणूक अधिकारी देव व सचिव शेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. यावेळी चेअरमन पदी उत्तम हारसिंग राठोड तर व्हाइस चेअरमन म्हणून सुमनबाई गणपत राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तत्पूर्वी माजी सरपंच जिजाबराव धर्मा राठोड, माजी सरपंच संजय रामदास जाधव, भाजपा विजाभजाचे गुलाब राठोड व सामाजिक कार्यकर्ते अर्जून राठोड आदींनी पॅनल प्रमुख म्हणून आपली भुमिका पार पाडली. त्याचबरोबर शेतकरी विकास पॅनल सदस्य म्हणून मुलचंद थावरू जाधव, एकनाथ आनंदा राठोड, चरणदास जाधव, धावजी झामु जाधव, देविदास मानसिंग चव्हाण, बळीराम फत्तु राठोड, सुशिलाबाई फकिरा राठोड, पंडित काळू चव्हाण, इरबान लक्ष्मण केदार व किसन चव्हाण आदींचा सामाविष्ट आहे.

Related Articles

Back to top button