जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने निर्बंध जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगाम-2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारणाकरीता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आयुक्तालय स्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार [email protected] वर सुद्धा मेलद्वारे पाठविता/नोंदवता येईल.
त्याचबरोबर जळगाव जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करणयात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वणी 9307525620 व दुरध्वनी 0257-2239054 या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा ईमेल आयडी [email protected] सोबत दिलेले आहेत.
संबंधीतांनी आपल्या जिल्ह्यात येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपल्या जिल्ह्याच्या भ्रमणध्वणी, दूरध्वनी व टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर नोंदवाव्यात. तक्रार नोंदविताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशिल द्यावा. किंवा सदरची माहिती को-या कागदावर लिहुन त्याचा फोटो व्हॅटसअप किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना व्हॅटसअपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दूरध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात.
जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडून तक्रारदाराचे समाधान न झाल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षाकडे नमूद केलेल्या भ्रमणध्वनी, दुरध्वनी व ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे अवाहन दिलीप झेंडे, कृषि संचालक (निवगुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.