जळगाव जिल्हा

बहुसदसिय प्रभागा मुळे राजकीय पक्षांचा कसा होतो फायदा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २३ सप्टेंबर २०२१ | मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये बहुत सदस्य पद्धतीने निवडणूक घेण्यात येईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. फडणवीस सरकारने ही पद्धत आणली होते त्याचा फायदा त्या वेळेस भाजपाला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र या निर्णयाला कडाडून विरोध करणाऱ्या महाविकासआघाडी ने देखील हाच निर्णय घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 

बहु सदस्य प्रभाग पद्धतीत महाविकासआघाडी ते तीन पक्षांमध्ये बंडखोरी होण्याचा धोका कमी होणार असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. याच बरोबर अपक्ष किंवा लहान पक्षाचे उमेदवार अशा प्रभागांमध्ये एक तर लढत नाहीत किंवा जिंकू शकतील इतकी त्यांची ताकद नसते त्याचा फायदा या सर्व मोठ्या पक्षांना होतो यामुळेच हा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जात आहे.

 

पूर्वीपासून असं म्हटलं जातं की खासदार हा पक्षाचा चिन्हावर निवडून येतो आणि नगरसेवक हा स्वतः केलेल्या कामांवर निवडून येतो. नगरसेवकांचे मतदारसंघ हे ठराविक भागात पुरताच मर्यादित असल्यामुळे नगरसेवकांना काम करण्याची चांगली संधी मिळते व ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र या बहूसदसिय प्रभागांमुळे पुन्हा एकदा पक्ष हा स्थानिक उमेदवार पेक्षा वरचढ ठरणार असून निवडणुकीमध्ये आता पक्षा ची ताकद वाढणार आहे.

 

एकच सदस्य प्रभाग पद्धत असली आणि तिथे आरक्षण आले तर प्रभागातील प्रभावी इच्छुक तिथे लढू शकत नाही मात्र बहुसदस्यीय पद्धतीत त्याच उमेदवाराला दुसऱ्या जागेवर संधी देता येते यामुळे पक्षांचे राजकीय गणित बरोबर ठरते यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील चर्चा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button