गुन्हेजळगाव जिल्हा
बलात्काराच्या गुन्ह्यात पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । अत्याचार प्रकरणी भडगाव पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी विजय दशरथ पाटील (25, रा.यशवंत नगर, भडगाव) यास बुधवारी बसस्थानक भागातून अटक करण्यात आली. आरोपीला तपासकामी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गुन्हे शाखा निरीक्षक किसन नजनपाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव आदींनी आरोपीला अटक केली.