जळगाव जिल्हाजळगाव शहर
पूरग्रस्तांपर्यंत पोहचली सेवारथ परिवाराची मदत
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । चाळीसगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो नागरिकांना फटका बसला आहे. जळगावातील सेवारथ परिवारतर्फे कपडे, खाद्य पदार्थासह विविध साहित्य मदत म्हणून त्यांना पाठविण्यात आले.
सेवारथ फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या मदतीमध्ये १२५ साड्या, १०० चटई, २७० फरसाणचे पाकीट, १२० बिस्किट पाकिटे, पाण्याच्या बाटल्याचे २०० खोके तसेच सोबत दोन रुग्णवाहिकांसह मदतीसाठी १२ कार्यकर्ते रवाना झाला आहे. अजून काही मदत लागल्यास देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सेवारथ संस्थेमार्फत दिलीप गांधी, डॉ.रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले. यासाठी चटई असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, राजू अडवाणी, विजय रेवतानी, कवी कासार यांनी मदत केली.