---Advertisement---
मुक्ताईनगर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

muktaingar
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यात काल अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तसेच घरांची पडझड झाली. याची महसुल यंत्रणेमार्फत तत्काळ पंचनामे करून शासनातर्फे नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरच्या वतीने मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले.

muktaingar

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जि.प. माजी गटनेते विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प.स.सभापती राजु माळी, संदिप देशमुख, सरचिटणीस कल्याण पाटील, रवींद्र दांडगे, सुनील काटे, लीलाधर पाटील,रउफ खान, आणि पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---