जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजपची युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. येथे नितीश कुमार यांनी राज्यपाल फगू सिंह चोहान यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. तर दुसरीकडे राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. येथे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. या पत्रावर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.
सत्ताधारी पक्ष जेडीयूने आपल्या आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व आमदार आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता बोलावण्यात आले आहे. पहिल्या फेरीत सीएम नितीश कुमार जेडीयूच्या सर्व 16 खासदारांसोबत बैठक घेणार असून, त्यामध्ये दिल्लीतील पक्षाच्या राजकारणात काय बदल होणार यावर चर्चा होणार आहे.दुसऱ्या फेरीच्या बैठकीत एनडीएबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीची दुसरी फेरी फक्त आमदारांसोबत असेल. या बैठकीत बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. एनडीएमध्ये राहायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री या बैठकीतच घेतील. संघटनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीत बोलावण्यात आले असून, फ्लोअर टेस्टची तयारी सुरू आहे. या बैठकीत एनडीएमध्ये नसल्याची चर्चा झाली, तर पुढचे सरकार कोणासोबत बनवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर सर्व आमदारांना पुढील 72 तास पाटण्यात राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. कारण युती तुटल्यानंतर पुढील युतीला फ्लोअर टेस्टला जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत सर्व आमदारांना पाटण्यात राहणे बंधनकारक आहे.