⁠ 
शनिवार, मे 4, 2024

नंदुरबारचा चोरटा जळगावात कैद, चोपडा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । चोपडा‎ ३० जून रोजी भरदिवसा चोपड्यात‎ व अमळनेरात घरफोड्या करणारा,‎ ‎ नंदुरबार येथील‎ ‎ संशयित जिम्मी‎ ‎ उर्फ दीपक‎ ‎ विपिन शर्मा‎ ‎ (वय २९)‎ ‎ याला स्थानिक‎ गुन्हे शाखेने अटक केली होती. त्या‎ गुन्ह्याच्या तपासात चोपडा शहर‎ पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शर्मा‎ याला अटक केली होती.‎ न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी‎ सुनावली होती. दरम्यान शहर‎ पोलिस ठाण्याच्या कोठडीत‎ असताना, १२ रोजी सायंकाळी‎ संशयिताने धारदार वस्तूने हाताच्या‎ नसा व गळा कापून घेत‎ आत्महत्येचा प्रयत्न केला.‎

संशयित शर्मा हा नंदुरबार येथील‎ सराईत गुन्हेगार आहे. त्याने‎ आतापर्यंत देशात वेगवेगळ्या ५०‎ ठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत. ३०‎ जून रोजी चोपड्यात त्याने‎ भरदिवसा चार व अमळनेर येथे एक‎ असे पाच घोरफोड्या केल्या होत्या.‎ या गुन्ह्यात त्याने तब्बल साडेसहा‎ लाखांचा ऐवज लांबवला होता. या‎ पैशातून त्याने रेल्वेने मुंबई गाठून‎ तेथून विमानाने दिल्ली गाठली होती.‎ अमळनेरच्या घरफोडीत तो‎ सीसीटीव्हीत कैद झाला होता.‎ त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न‎ करत असताना अमळनेर ते नरडाणा‎ दरम्यान एका ढाब्यावरील‎ सीसीटीव्हीत तो आढळला होता.‎

त्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा‎ रचून नंदुरबार येथून अटक केली‎ होती. नंतर त्याला चोपड्याच्या‎ गुन्ह्यात शहर पोलिसांकडे सोपवले‎ होते. त्याने आत्महत्येचा प्रयत्न‎ केल्यामुळे पोलिसांची धावपळ‎ उडाली. त्याला उपजिल्हा‎ रुग्णालयात दाखल केले. डॉ.पंकज‎ पाटील, डॉ.हेमंत पाटील यांनी‎ उपचार केले. डीवायएसपी कृषिकेश‎ रावले यांनी या घटनेची माहिती‎ जाणून घेतली होती.‎