---Advertisement---
गुन्हे एरंडोल

धक्कादायक! आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

---Advertisement---

Erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । सध्या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून एक संतापजनक घटना समोर आली आहे. माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी देऊन सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांत दिली आहे.

crime girl rep

तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथील जोगेश्वरीनगर येथे गेले असता त्यांना ही युवती व दिनेश बाबूलाल पवार हा एका खोलीमध्ये आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही एरंडोल येथे आणले असता पीडित युवतीने आपबीती पोलिसांना दिली. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. 

---Advertisement---

दिनेश याने माझ्याशी लग्न कर अन्यथा मी गळफास घेऊन आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल, अशी धमकी दिली. घरात याबाबत कोणालाही सांगायचे नाही, असे देखील धमकावले. ३ ऑक्टोबरला संशयित दिनेशने पीडितेस औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरीनगरमध्ये भाड्याची खोली घेऊन अत्याचार केले. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दिनेश पवार याच्याविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---