जळगाव जिल्हाबातम्या
तर महाविकास आघाडीच्या एकही मंत्र्याला जिल्ह्यात फिरकु देणार नाही – महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । जिल्हात येत्या दोन दिवसत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महाविकास आघाडीच्या एकही मंत्र्याला संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फिरकु देणार नाही, असा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी आज शेतकरी आंदोलनावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांची पीकं जळत आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये असं चित्र निर्माण झाला आहे. आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते एसीमध्ये बसून हे सर्व पाहात आहेत. परंतु, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही पुढे येत नाहीयेत.असे वेळी गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.