जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी ८ दिवसात करून दाखवलं – उन्मेष पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । खान्देशात गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी २ वर्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मागे लागलो मात्र त्यांच्याकडून काहीही झालं नाही. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फक्त ८ दिवसात यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली यामुळे जे उद्धव ठाकरेंना २ वर्षात जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी ८ दिवसात करून दाखवलं असा टोला उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरे यांना लगावला.
सत्तेसाठी पदे अन् राजकारण करु नका, आधी मातीशी निष्ठा राखा, शेतकऱ्यांची निष्ठा राखा, मग राजकारण करा या शब्दात उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. चाळीसगाव तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी उन्मेश पाटील पत्रकारांशी बोलत होते.
खान्देशात गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी अनेकदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र तब्बल दोन वर्ष उलटूनही परवानगी मिळाली नाही. मात्र योग्य वेळी ती परवानगी मिळाली असती तर खान्देशाच्या मातीशी निष्ठा राखण्याचा आणि बोलण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असता. मात्र आता तुम्हाला तो अधिकार नाही. सरकार बदल्यानंतर आठ दिवसात या प्रस्तावाला मान्यता मिळते, आणि आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही दोन दोन वर्ष त्याला मान्यता मिळत नाही, याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित करत, राजकारण करण्यापेक्षा तिरंग्यावर निष्ठा दाखवा असा सल्ला भाजप खासदार उमेश पाटलांचा आदित्य ठाकरेंना सल्ला दिला आहे.