⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना ‘गिरणा पुरस्कार’ प्रदान

जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांना ‘गिरणा पुरस्कार’ प्रदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्या हस्ते शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . कवी कालिदास नाट्यगृहात हा सोहळा पार पडला या वेळी अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे , जलपुरूश राजेंद्रसिंग , पालकमंत्री छगन भुजबळ, गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, इतर मान्यवर उपस्थित होते .

नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार शंभु पाटील यांना प्रदान करण्यात आला . गिरणा गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो . या वर्षांपासून तो नाट्यक्षेत्रातील रंगकर्मीना द्यायची सुरवात शंभु पाटील यांच्या पासून करण्यात आली. कालच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला . गिरणा काठावर कुवारखेडा गावच्या रंगकर्मीला मिळालेल्या या “गिरणा पुरस्कारा”च मोल मला अधिक आहे . ज्या नदीच्या पाण्यावर माझं भरण पोषण झालं त्या नदीच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याच श्रेय परिवर्तन जळगाव परिवाराला आहे . परिवर्तनने केलेले सृजनशील उपक्रम या मुळेच माझा सन्मान झाला आहे . अश्या भावना शंभु पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.


या प्रसंगी कवी राजू देसले , कवी प्रकाश होळकर , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . यापूर्वी हा पुरस्कार डॉ भालचंद्र नेमाडे , सिंधुताई सपकाळ , मा. भवरलाल भाऊ जैन , डॉ मोहन आगाशे , ऍड उज्वल निकम , रतनलाल .सी. बाफना , लेखक रंगनाथ पठारे सर , आदि मान्यवरांना या पूर्वी हा पुरस्कार देण्यात आला आहे . काल झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री छगन भुजबळ , राजन गवस , गुरू ठाकूर , नीलिमा मिश्रा या मान्यवरना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.