⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जामनेर येथे जप्त केलेल्या शेतजमीनीचा जाहिर लिलावाव्दारे विक्री

जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | जामनेर येथे जप्त केलेल्या शेतजमीनीचा जाहिर लिलिवाव्दारे विक्री होणार आहे. खावटीची रक्कम वसुल करण्यासाठी 6 जून, 2022 रोजी तहसिल कार्यालय जामनेर येथे हा लिलाव होणार आहे.

अधिक महिती अशी कि,  मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायालय जळगाव यांचेकडील फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 616 / 2020 या दाव्यामध्ये गैरअर्जदार गजानन दौलत जगताप रा. मांडवे खु. यांचेकडून खावटीची रक्कम रुपये 4,56,000/- मात्र वसुल करणेबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु गैरअर्जदार श्री. गजानन दौलत  जगताप यांनी आजपर्यत  सदर खावटीची रक्कम मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांचकडे अदा केलेली नसल्यामुळे त्यांचेकडील खावटीची रक्कम वसुल करणेकामी त्यांची मौजे मांडवे खु. ता. जामनेर येथील शेतजमीन गट क्र. 78/01 खाते क्र. 614 वरील महाराष्ट्र शासन या क्षेत्रातील जागेचे क्षेत्र 0.45.25 आकार 1.40, पो.ख.0.01.25 पुरते या जप्त केलेल्या शेतजमीनीचे  दिनांक 26 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहिर लिलाव करण्यात आलेला होता. 

परंतु सदर लिलावात कोणीही भाग न घेतल्याने वरील मालमत्तेचा लिलाव स्थगीत करण्यात आलेला आहे. तसेच पुढील  दिनांक 6 जून, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी   जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलवात भाग घ्यावा,  तसेच  लिलावातील अटी व शर्ती, लिलावातील शेतजमीन, लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार जामनेर अरुण शेवाळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.