महापौरांनी केली पालकमंत्र्यांना मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज | ४ एप्रिल २०२२ । जळगाव शहर मनपा मध्ये आयुक्त बदलीचे वारे वाहू लागले आहेत. सद्यस्थितीत आयुक्त असलेले सतीश कुलकर्णी यांची 30 एप्रिल रोजी सेवा समाप्त होणार आहे. यामुळे येणार आयुक्त हा आय ए एस दर्जाचा अधिकारी असावा अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव मनपामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सतीश कुलकर्णी हे आयुक्त म्हणून विराजमान आहेत. येत्या 30 एप्रिल रोजी ते प्रशासकीय कामकाजातून सेवानिवृत्त होणार आहेत. सतीश कुलकर्णी गेले की आता आयुक्त कोण असा प्रश्न संपूर्ण जळगाव शहराला पडला आहे. यामुळे जळगाव शहराचा होणारा पुढचा आयुक्त हा आयएएस अधिकारी असावा अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
जळगाव शहराला अतिक्रमणाने वेढले आहे. जळगाव शहराला अतिक्रमण मुक्त करायचे असेल तर जळगाव मनपा मध्ये सक्षम आयुक्त असणे अतिशय गरजेचे आहे. याच बरोबर जळगाव शहर महानगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी देखील एक शिस्तबद्ध आय ए एस ऑफिसर जळगाव शहर महानगरपालिकेला मिळणे अतिशय गरजेचे असल्याने जळगाव शहर महानगरपालिकेला आयएएस दर्जाच्या अधिकारी आयुक्त म्हणून नेमण्यात यावा अशी मागणी यावेळी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे