⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चोरट्यांचा प्रयत्न फसला पण १० लाखांच्या नोटांची झाली राख

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । फैजपूर शहरात चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरचा वापर करून फोडण्याचा  प्रयत्न केल्याचा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आला होता. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न फसल्याने ४५ लाखांची रोकड बचावली होती. पण, एटीएम कापण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने आग लागून ४५ पैकी १० लाखांच्या नोटा जळाल्याचे समोर आले. असून, तसा पंचनामा करण्यात आला.

सविस्तर असे की, फैजपूर शहरातील यावल रोडवरील दूध शीतकरण केंद्राजवळील स्टेट बँकेचे एटीएम आहे. येथे चोरट्यांनी एटीएम फोडताना आधी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. यानंतर गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात मशीनला आग लागल्याने शनिवारी पहाटे चोरट्यांचा प्रयत्न फसला. यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, गॅस कटरच्या वापराने एटीएमचे डिजिटल लॉक खराब झाले. यामुळे दिल्लीहून तंत्रज्ञाला बोलावण्यात आले. यानंतर सोमवारी पोलिस बंदोबस्तात एटीएम मशीन उघडण्यात आल्यावर त्यात ३५ लाखांची रोकड सुरक्षित आढळली. मात्र. १० लाख ८४ हजारांच्या नोटा अर्धवट जळाल्याचे दिसून आले. तसा पंचनामा करण्यात आला.