चोपड्याजवळ भीषण अपघात : २ जण ठार, ३ जखमी

जानेवारी 23, 2023 4:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । चोपडा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अकंलेश्वर महामार्गावर अडावद गावाजवळ असलेल्या गवळी नाल्या जवळ ट्रक व दुध गंगा पिकअप बोलेरोचा भिषण अपघात झाला. दि. २२च्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत २ जण ठार झाले. तर ३ जण गंभीर जखमी झाले.

chopda accident jpg webp

अधिक माहिती अशी कि, चोपड्याकडुन अडावदकडे येत असलेल्या ट्रक क्र. जी.जे.१२ बी.टी.९३९७ व जळगावहुन चोपड्याकडे जात असलेल्या दुध डेअरीची पिकअप बोलेरो क्र. एम.एच.१९ सी.वाय. ५६७४ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी पिकअप बोलेरोमधील २ जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisements

या दुर्घटनेतील मृतात चोपडा तालुक्यातील कठोरा येथील प्राथमिक शिक्षक नितीन दामू मोरे (वय ४५) व गणेश काशिनाथ देशमुख (वय ३२) यांचा समावेश आहे. तर गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडूरंग देशमुख (३२), चुनिलाल खुशाल देशमुख (३१) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisements

या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे किरण दांडगे, पोउनि जगदिश कोंळबे, शरिफ तडवी, मुकेश तडवी, नासिर तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात नोंद होण्याचे काम सुरु होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now