जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । गुलाबराव पाटील यांच्या बद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. त्यांनीच आम्हाला पक्ष निष्ठा शिकवली मात्र त्यांची काहीतरी मजबुरी आहे म्हणून त्यांना आदित्य ठाकरेंच्या विरोधात बोलावं लागत आहे. अशी प्रतिक्रिया जळगाव लाईव्हशी बोलताना युवासेनेचे राज्यसचिव विराज कावडीया यांनी दिली.
यावेळी विराज कावडीया म्हणाले कि, जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. गुलाबराव पाटील यांनीच आम्हाला निष्ठा शिकवली आहे. ते कालही आमच्यासाठी आदरणीय होते. आजही आहेत उद्याही असणार. येत्या काळात ते पुन्हा शिवसेनेत येतील तेव्हा हा आदर तितकाच असणार आहे.यामुळे ते करत असलेली टीका खूप चुकीची आहे.
गुलाबरावांना जश्यास तस उत्तर आम्ही देऊ शकतो मात्र ते आम्ही देणार नाही कारण तशी आमची शिकवण नाही. आदित्य ठाकरे यांचे आमच्यावर संस्कार आमच्यावर असल्याने आम्ही ते करणार नाही. मात्र ५ आमदारांपैकी फक्त गुलाबराव पाटील आमच्यावर हल्ला करत आहेत. चुकीची वक्तव्य करत आहेत. याचा अर्थ मंत्रिपद मिळाल्याने त्याची काहीतरी गोची झाली आहे. त्यांची काहीतरी मजबुरी आहे असे विराज कावडीया म्हणाले.