Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी गावठी बनावटीच्या पिस्तूल बगणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी बाजार पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्समधील दुर्गा माता मंदिर जवळील रोडवर दोन व्यक्ती गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून सैय्यद सिकंदर बशरत अली (वय ४२, रा. कवाडे नगर भुसावळ) आणि नरेश देविदास सुरवाडे (वय २९, रा. गोलानी कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर जवळ भुसावळ) यांना ताब्यात घेतले.
या दोघांकडून गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.