---Advertisement---
वाणिज्य

खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण ; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा नवे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । तुमचा जर लग्नासाठी दागिने खरेदीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मागील काही दिवसापासून सोन्याच्या (Gold Rate) किमतीत घसरण झाली. त्यामुळे सोने 56 हजाराच्या खाली आले आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोबतच चांदी (Silver Rate) देखील स्वस्त झाली आहे. आज शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 0.63 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदी 0.93 टक्क्यांनी घसरली. Gold Silver Price Today

gold silver jpg webp webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आजचा दर?
आज शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 355 रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर 55,873 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत 611 रुपयाची घसरण झाली. यामुळे प्रति किलो चांदीचा दर 65,022 व्यवहार करत आहे. यापूर्वी काल एक किलो चांदीच्या दर 65,720 रुपयावर होती.

---Advertisement---

जळगावातील दर
दरम्यान, जळगाव सवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. 2 फेब्रुवारी 2023 ला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव तब्बल 58800 रुपायांवर गेला होता. मात्र आता सोने सर्वकालीन उच्चांकावरून 2000 हजार रुपयांहुन अधिकने घसरले आहे. सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,600 ते 56,700 रुपयापर्यंत आहे . तर चांदी दर 65500 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---