जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी रोजी पाचोरा शहरात आरोग्य अधिकारी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर कोविड संबंधित आदि अडचणी बाबत चर्चा केली व शहरात वाढती रुग्णसंख्या रिमडेसिवीरची पूर्तता यासारख्या गोष्टी बद्दल चर्चा केली. त्याच बरोबर पाचोरा शासकीय रुग्णालयात सोईसुविधा ऑक्सीजन आणि इतर गोष्टी बद्दल पाहणी केली.
यावेळी त्यांनी पत्रकाराना प्रतिक्रिया देताना सांगितले की, जिल्ह्यात भर हा आत्ता टेस्ट आणि लसीकरणावर जास्त असेल कारण छोटे मोठे उद्योग धंदे कामगार याची परिस्थिती नाजूक आहे. यावर सरकर्शी बोलुन काही मार्ग काढणार आहे.
या प्रसंगी अधिकारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी पाचोरा भडगाव अमित साळुंखे, भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा डॉक्टर समाधान वाघ, वैद्यकीय अधिकारी पाचोरा तालुका इतर बैठकीत उपस्थित होते.