जळगाव लाईव्ह न्यूज| २६ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरातील कचरा संकलन करण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीला जळगाव मनपा तर्फे करार तत्त्वावर ठेका देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मनपातर्फे न देण्यात येणाऱ्या बिलामुळे वॉटरग्रेस कंपनी ठेका रद्द करण्यास उत्सुक आहे. असे म्हटले जात आहे.
याबाबत वॉटरग्रेस कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वॉटरग्रेस कंपनी ठेका रद्द करण्याबाबत अजून कोणताही अधिकृत आदेश किंवा पत्र आलेले नाही. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, गेल्या दोन महिन्यापासून वोटर्ग्रेस कंपनीला महानगरपालिकेने बिल अदा केलेले नाही. पर्यायी जवळजवळ तीन कोटी रुपये महानगरपालिकेला वॉटरग्रेस कंपनीला आदा करायचे आहे.जे अजून करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यापासून पाच टक्के कपात देखील मनपातर्फे बिलामध्ये करण्यात आली होती. त्याचेही 35 लाख रुपये अजून अदा करणे बाकी आहेत. मात्र अजून ठेका बंद करण्याबाबत कोणतेही आदेश कंपनीकडून आलेले नाहीत.
तर दुसरीकडे मनपा प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ठेका बंद करण्याबाबत अजून अधिकृत पत्र आमच्याकडे कंपनीतर्फे आलेले नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासूनचे बिल अदा करणे बाकी आहे. ही खरी बाब आहे.
जळगाव शहरात वॉटरग्रेस कंपनीला तीन वर्षाचा करारा मार्फत ठेका देण्यात आला होता. यामध्ये कचरा संकलन करणे हे या कंपनीला सांगण्यात आले होते. मात्र कंपनी व्यवस्थित कचरा संकलित करत नाही. याबाबत महासभेत कित्येक नगरसेवकांनी आवाज उठवला. याचबरोबर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देखील आमदार राजूमामा भोळे यांनी देखील याबाबत तक्रार केली होती. तर नागरिकांकडूनही शहरात वॉटरग्रेस कंपनी व्यवस्थित कचरा संकलित करत नाही असेही म्हटले जात होते. तर आता मनपा प्रशासन बिल अदा करत नाहीये. पर्यायी यामुळे चारही बाजूने अडकलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडे आता ठेका रद्द केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असेही म्हटले जात आहे.