बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यावर नितेश राणेंचा घणाघात ; म्हणाले, खिचडी चोर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. राज्यातील सर्वात मोठा दरोडेखोर, खिचडी चोर जळगावच्या दौऱ्यावर आहे. प्रशासनाने आदेश देऊन ही शेंबड्या मुलासारखे नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्याने दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितलं पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. ते पावसात भिजले होते की राऊत ने बिसलेरी ओतलेली हे त्यांनाच माहिती, असंही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काही वेळा आधी झालं. त्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे. मात्र यावरुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे. याआधी सिंधुदुर्ग रत्नागिरी ज्यांनी लुटली अशा लोकांवर मी भाष्य करत नाही, असं म्हणत एका वाक्यात अंबादास दानवेांनी उत्तर दिलं आहे.