राजकारण
औरंगाबादचे संभाजीनगर करणे म्हणजे हुकूमशाही – असदुद्दीन ओवैसी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । केंद्र सरकारने वतीनं राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला किंवा वाईट असू शकतो पण तो इतिहासच असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे.
आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडं संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असंही ओवैसी म्हणाले.