जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर म्हसावद रस्त्यावर असून सध्याच्या कोरोना काळात कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्याचे केंद्र आहे अशी अपेक्षा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही प्रमाणात फोल ठरु पाहत आहे. सध्या स्थितीत या रुग्णालयात कमीतकमी ऑक्सिजनचे मोठे २५ सिलिंडर व २५ छोटे सिलिंडरची नितांत गरज आहे. सध्या येथील उपलब्ध ऑक्सिजनच्या सर्व खाटा पूर्ण भरल्या आहेत. नविन अत्यवस्थ कोरोना रुग्ण जर दाखल झाले तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्यांना सेवा देणे कठीण होईल असे चित्र आहे.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात ७ परिचारिका, ४ कर्मचारी २ वैद्यकीय अधिकारी सेवेत आहेत. १ वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त आहे.तसेच प्रयोग शाळेत तंत्रज्ञ पदाची जागा रिक्त आहे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय दोन सफाई कामगारांच्या जागा रिकाम्या असल्यामुळे रुग्णांना योग्य ती सेवा पुरवण्यास अडथळा निर्माण होतो. एक वाहन चालकाची जागा रिक्त आहे. विशेष करून शवविच्छेदनासाठी सफाई कामगाराची नितांत गरज आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा तळई रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मधील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र मधील वैद्यकीय अधिकारी परिचारिका व इतर कर्मचारी यांना वाहनासह करोणा काळाच्या पार्श्वभूमीवर वर्ग करण्यात यावे. अशी जाणकारांची अपेक्षा आहे या केंद्रांच्या १०२ क्रमांकाच्या गाड्या, एरंडोल ग्रामीण रुग्णालयाला लावण्यात याव्यात त्यामुळे आरोग्य सेवा देण्याबाबत मोठी मदत होऊ शकते. जेणेकरून आरोग्य यंत्रणा मजबूत होऊ शकेल.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत व्हेंटिलेटर कधिही उपलब्ध झाले नाही. एक्स-रे यंत्र आहे. मात्र डबल ऑक्सिजनचे यंत्र नाही. रोजच्या ओपीडी मध्ये दोनशे नागरिक येतात. शिवाय लसीकरण मोहीम ही कामे आटोपून कोरोना रुग्णांना उपचार करावे लागत आहेत त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेची दमछाक होताना दिसून येते. एकंदरीत कोरोना चे वाढते संकट लक्षात घेता. व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता एरंडोल ग्रामीण रुग्णालयाला प्राथमिक आरोग्य केंद्रांची ताकद देऊन तील आरोग्य यंत्रणेचे मजबुतीकरण होऊ शकते.