ऑकटोबर महिना बँकांसाठी ठरणार ‘सुट्टी महिना’
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । येणारा ऑक्टोबर महिना हा दसरा दिवाळी हे दोन मोठे क्षण घेऊन येणार आहे. यामुळे या महिन्यात देशभरातील राज्यांच्या सुट्ट्यांचा विचार केला तर महिन्यात जेवढे दिवस बँका सुरू राहतील त्याहून अधिक दिवस बँकांना सुट्या असणार आहेत. तब्बल वीस दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे तुमच्या ठिकाणानुसार सुट्ट्या आणि बँकांचे नियोजन करावे लागणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र सह विविध राज्यात 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. म्हणजेच दहा दिवस बँकांचे कामकाज सुरळीत राहणार असून इतर सर्व दिवस बँका बंद राहणार आहेत. अशावेळी इतर दिवशी बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे कारण याच महिन्यात देशातील कित्येक नागरिकांच्या खात्यामध्ये त्यांच्या कंपनी दिवाळीचा बोनस जमा करत असतात. आरबीआयने ऑक्टोबर महिन्याच्या बँक सुट्टी ची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी देशभरात बँक बंद राहणार आहेत.
दोन ऑक्टोबर गांधी जयंती महाराष्ट्रात सुट्टी. ५ ऑक्टोबर दसरा महाराष्ट्रात सुट्टी, ८ ऑक्टोबर दुसरा शनिवार महाराष्ट्रात सुट्टी.९ ऑक्टोबर रविवार महाराष्ट्रात सुट्टी.१६ ऑक्टोबर रविवार महाराष्ट्रात सुट्टी.२२ ऑक्टोबर चौथा शनिवार महाराष्ट्रात सुट्टी.२३ ऑक्टोबर रविवार महाराष्ट्रात सुट्टी.२४ ऑक्टोबर दिवाळी महाराष्ट्रात सुट्टी.२५ ऑक्टोबर दिवाळी महाराष्ट्रात सुट्टी. २६ ऑक्टोबर दिवाळी महाराष्ट्रात सुट्टी. ३० ऑक्टोबर रविवार महाराष्ट्रात सुट्टी.