⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | उद्या कळमसरे येथे भवानी मातेचा यात्रोत्सव

उद्या कळमसरे येथे भवानी मातेचा यात्रोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

—-

     जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ ।      येथील गावाच्या ग्रामदैवत भवानी मातेचा यात्रोत्सव उद्या ता.९ रोजी होणार आहे.दरवर्षी पाडव्या नंतर दुर्गा अष्ठमीला हा यात्रोत्सव साजरा केला जातो.
    गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर असून गावाच्या पच्छीमेला शहापुर रसत्यावर गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर मोठ्या भवानी मातेचे मंदिर आहे.हा यात्रोत्सव लहान भवानी मातेच्या मंदिर परिसरात भरविला जातो.या यात्रोत्सवाला सुमारे  दीडशे वर्षाची परंपरा असून नवस फेडीसाठी  मोठी गर्दी होते. 

         कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून बंद असलेली यात्रा होत असल्याने गावात नवस फेडीसाठी मोठी संख्या असल्याने.कळमसरे येथील रहिवासी सूरत येथील माळी समाजाचे अध्यक्ष , सुरत येथील नगरसेवक  सुधाकर चौधरी ,त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दक्षाताई चौधरी यांनी  गावातील माळी समाजाच्या सामुहिक नवस फेडण्याच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.यावेळी सामूहिक नवस फेडुन गावासह परिसरातील पाच हजार  भाविकाना  महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन श्री सुधाकर चौधरी व त्यांची पत्नी दक्षाताई चौधरी यांनी स्वखर्चाने केले आहे.

दरम्यान भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली असून गावात उपहारगृहे ,पाळना ,खेळन्याची दुकाने आधीच दाखल झाली आहेत.रात्री लोकमनोरंजनासाठी सुकलाल भाऊ बोराडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह