उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का : हा बडा नेता शिंदे गटात
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शिवसेना वाचावी यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. मात्र यातच शिवसेनेला अजून एक धक्का बसला आहे. हा धक्का साधासुधा नसून शिवसेनाला या नेत्याच्या जाण्याने मोठे नुकसान होणार आहे असे म्हटले जात आहे.
शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुती करत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु झाली आहे. नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. ते उद्या शिवसेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
याच बरोबर संभाजीनगरमध्ये पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेनं आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडील महानगप्रमुख हे पद काढून घेतलं होतं. मात्र, पुन्हा एकदा शिंदे गटानं प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगप्रमुखपदी नियुक्ती केलीय.