गुरूवार, जून 8, 2023

..तर बाजार समितीचा कायापालट करणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ ।  सत्तेच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट करणारच असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत केले यावेळी पाळधी येथे सुरु असलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जेष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील होते.यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, गजानन पाटील, ऋषिकेश चव्हाण, प्रेमराज पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, संजय माळी, मुकुंदराव नन्नवरे, विलास महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील, प्रास्ताविक सुनील पवार तर आभार पी. एम. पाटील यांनी मानले.

आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकार पॅनलचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, सुभाष पाटील, गजानन पाटील, भगवान महाजन आदींनी सहकार पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.