जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । पाच राज्यांच्या निवडणुकानतंर भारतात इंधनाचे दर वाढतील असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र देशात अद्यापही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतात चार नोव्हेंबर 2021 रोजी कर कमी केल्याने पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रल, डिझेलची दरवाढ अटळी मानली जात आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच दर वाढविले जातील असा अंदाज होता. मात्र आजही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.