जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने व्हॅलेंटाइन वीकमधील ’प्रपोज डे’ला तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना बुधवारी जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये घडली. तिच्याकडे पाहत असतानाच त्याने नस कापल्यामुळे तरुणी देखील भांबावली. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत तरुणास जीएमसीत दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
व्हॅलेंटाइन वीक सुरू असताना ‘प्रपोज डे’ला जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला.
हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे फुले मार्केट परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?