⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात भाजपाच कंदील आंदोलन

राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात भाजपाच कंदील आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी कंदिल आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा कार्यकर्ते शहरातील प्रमुख ठिकाणी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे राहतील, अशी माहिती भाजपा चे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले कि, राज्यातील सध्याच्या वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी. तर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे.


देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील, व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह