⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भुसावळात 37 हजारांचा गुटखा जप्त : आरोपीला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुमारे 37 हजारांच्या गुटख्यासह दोन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. सोमवार, 9 रोजी सकाळी 11.15 वाजेच्या सुमाास हॉटेल तनारीकाजवळ ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना चारचाकी वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळील साक्री फाट्याजवळ वॅगन आर (एम.एच.19 सी.एफ.1620) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला 36 हजार 720 रुपये किंमतीचा गुटखा तसेच दोन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी कॉन्स्टेबल सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी राहुल मनोहरलाल साधवानी (31, सिंधी कॉलनीमागे, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. तपास हवालदार रवींद्र बिर्‍हाडे करीत आहेत.