⁠ 
शनिवार, मे 4, 2024

Big Breaking : फडणवीस सरकारच्या मंत्रिपदाची यादी ‘लीक’?, वाचा कुणाला मिळणार संधी!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. येत्या काळात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येत सत्ता बसवणार आहे असे म्हटले जात आहे. आता यात कोण मंत्री कोण असतील? त्यांची नवे काय असतील? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र सध्या सोशल नेटवर्कींग साईटवर फडणवीस सरकारच्या मंत्रिपदाची यादी ‘लीक’ झाली आहे. मात्र यात किती तथ्य आहे हे कोणालाच माहित नाही. मात्र जर हि यादी खरी असली तर या आमदारांचे नशीब उजळणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उत्साही आणि लॉबिंग करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदासाठी जरा सबुरीने घेण्याचा सल्ला वजा सूचना केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले व राज्यपालांकडे आपला राजीनामा ठेवला. राज्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडीनंतर काल दुपारी राज्यातील मविआ सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली होती. राज्यावर गेल्या आठ दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचे ढग जमले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर ठाकरे सरकारने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निकाल आपल्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.
हे देखील वाचा : भाजपची आज महत्त्वाची बैठक ; देवेंद्र फडणवीस करणार मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत या आमदारांच्या सिक्युरिटीसाठी केंद्र शासनाने मुंबईमध्ये मोठा बंदोबस्त केला आहे मिलिटरी, प्यारा – मिलिटरीचे जवान मुंबई तैनात केले गेले आहेत अशा वेळी शिवसैनिकांना संयम राखा मुंबईमध्ये तुमचं रक्त सांडू देऊ नका असं आवाहन केले आहे. यामुळे आता भाजपची सत्ता अविघ्नपणे बसेल हे नक्की झाले आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे गटासोबत मिळून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन-तीन दिवसात नवीन सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस सरकारची एक मंत्रिमंडळ यादी व्हायरल होत असून त्याची जळगाव लाईव्ह पुष्टी करीत नाही.

मंत्रिपदाचा प्रस्तावित वाटप
1) मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
२) उपमुख्यमंत्री, नगरविकास, रस्ते विकास
एकनाथ शिंदे

कॅबिनेट मंत्री
3) चंद्रकांत पाटील – महसूल
4) सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन
5) दादा भुसे – ग्राम विकास
6) प्रवीण दरेकर – पीडब्ल्यूडी
7) गुलाबराव पाटील – सिंचन
8) आशिष शेलार – शालेय शिक्षण
9) गिरीश महाजन – वैद्यकीय उच्चशिक्षण
10) राधाकृष्ण विखे पाटील – शेती
11) संजय कुटे – आरोग्य
12) अशोक उईके – आदिवासी
13) बबन पाचपुते – अन्न नागरी पुरवठा
14) संभाजी निलंगेकर – उद्योग
15) सुभाष देशमुख – सहकार
16) राम शिंदे – ओबीसी व्हीजेएनटी
17) तानाजी सावंत – ऊर्जा
18) संदीपान भुमरे -जलसंपदा
19) संजय राठोड – वने
20) प्रताप सरनाईक – पर्यावरण
21) शंभूराज देसाई – गृहनिर्माण
22) अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक
23) प्रशांत ठाकूर – मत्स्यपालन
24) किसन कथोरे – अन्न सुरक्षा
25) आशिष जैस्वाल – वाहतूक
26) सुहासिनी फरांदे – महिला बालविकास
27) बबन लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
28) चंद्रशेखर बावनकुळे – उत्पादन शुल्क
१९) जयकुमार रावल – पर्यटन
30) उदय सामंत – उच्च तांत्रिक

राज्यमंत्री
1) दिपक केसरकर -महसूल
२) बच्चू कडू-वाहतूक
3) मोनिका राजले – महिला बालविकास
4) अनिल बाबर -सामाजिक न्याय
5) रणधीर सावरकर- नगरविकास
6) राजेंद्र पाटणी-ऊर्जा
7) निलय नाईक- ग्राम विकास
8) अतुल भातखळकर-गृहनिर्माण
9) लक्ष्मण पवार-शालेय शिक्षण
10) भरत गोगावले-पर्यटन, MREGS मत्स्यपालन आणि फलोत्पादन
11) संजय सिरसाट-पीडब्ल्यूडी