⁠ 
रविवार, मे 5, 2024

एकनाथ खडसेंवर होणारी कारवाई ‘आमच्यासाठी’ अयोग्य ! – खा. रक्षा खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या वर्षभरापासून ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई आमच्यासाठी जरी अयोग्य असली तरी देखील केंद्र शासनाच्या ईडी विभागासाठी ही कारवाई योग्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षात केंद्र सरकारने कशाप्रकारे भारताच्या विकासासाठी प्रयत्न केले. याची माहिती भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी एकनाथराव खडसे यांच्यावरची कारवाई सुरू आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, एकनाथराव खडसे यांच्यावर जी कारवाई सुरू आहे. याबाब कोर्ट जो निकाल देईल तो मान्य असेल. कारण की, आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. मात्र आमच्या मते ही कारवाई चुकीची आहे. तर केंद्राच्या ईडीतर्फे ही कारवाई योग्य आहे. यामुळे आता ही न्यायालयीन बाब बनली आहे. न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली

तर दुसरीकडे महागाईच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, देशात महागाई वाढावी अशी कोणाची इच्छा नाही. मात्र देशाचा विकास करण्यासाठी ज्याप्रकारे विविध योजना राबवल्या जात आहे. त्यासाठी ही महागाई वाढली आहे अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.