जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीच्या भवितव्यासाठी लोकसहकार, प्रगती शिक्षक सेना गटाने युती केली दोन्ही गटाचे 11 संचालक असून स्पष्ट बहुमत असल्याने पहिल्या वर्षी प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे ग.स. सोसायटीचे अध्यक्ष राहतील, अशी माहिती लोकसहकार गटाचे पॅनल प्रमुख मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, ग.स.सोसायटीत बहुमतासाठी मॅजिक फिगर 11 असून लोकसहकारचे 5 व प्रगती पॅनलचे 6 असे 11 संचालक आमच्याकडे आहेत. पाच संचालक सोबत असून बाकीचे संचालक सहलीला गेले आहेत. ते उद्या दि. 12 रोजी ग.स.च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी येतील असेही त्यांनी सांगितले. लोकसहकार गटाचा एक संचालक नॉट रिचेबललोकसहकार गटाचा एक संचालक गेल्या दोन दिवसापासून नॉटरिचेबल आहे. त्यामुळे ते विरोधी गटात गेले असतील असे आम्हाला काही वाटत नाही पण, विरोधी गटाकडून ते आमच्याकडे असल्याचे सांगितले जात असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. परंतु, त्यांनी संबंधित संचालकाचे नाव सांगणे टाळले.
ग.स.च्या हितासाठी युती ः
रावसाहेब पाटीलसहकार गटाने निवडणुकीच्या अजेंड्यात अयाराम- गयारामांना स्थान देणार नसल्याचे म्हटले होते. आता त्यांनाच घेण्यासाठी ते सर्वात पुढे सरसावले आहेत. त्यामुळे ते काय ग.स.चे हित पाहणार, असा सवाल उपस्थित करीत ग.स.च्या हितासाठी लोकसहकार गटासोबत पाच वर्षासाठी युती केली असून पहिल्या वर्षी प्रगती पॅनलचा अध्यक्ष राहिल तर लोकसहकारचा उपाध्यक्ष राहणार आहेत. असाच फाऱमेंट दरवर्षी राहणार आहे. त्यामुळे ग.स. सोसायटीच्या हितासाठी व सभासदांना कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.