⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | दोन वेगवेगळ्या खटल्यात तीघा आरोपींना एका वर्षाचा कारावास

दोन वेगवेगळ्या खटल्यात तीघा आरोपींना एका वर्षाचा कारावास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । भडगांव येथील मे.मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात चाललेल्या एका गौण खनिज वाळु उत्खननच्या खटल्यात शुक्रवारी दोघाही आरोपी विरुध्द भा.दं.वि.क ३७९सह ३४ अन्वये गुन्हा सिध्द झाल्याने,दोघा आरोपीना प्रत्येकी एका वर्षाची कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

खटल्याची हकिगत अशी आहे की,दिनांक २८/०६/२०११ रोजी  ९०० वाजता मौजे गिरड ते अंजनविहिरे  रोडवर आरोपी नाना भास्कर पाटील व  सुभाष धनराज पाटील दोघेही रा.गिरड ता.भडगांवा यांनी संगनमताने गिरणा नदीचे पाञातुन गौण खनिज वाळु उत्खनन करुन,त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये विनापास परमिट लबाडीच्या इराद्याने चोरुन घेवुन जात असतांना मिळुन आला म्हणुन फिर्यादी सुरेश तुकाराम महाले तहसिल कार्यालय,भडगांव यांनी आरोपीच्या विरुध्द भडगांव पो.स्टे. ला गु.नं.८३/२०११ भा.दं.वि.क.३७९ सह ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.     सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.काॅ.हिरालाल सुपडु पाटील यांनी करुन,दोघाही आरोपी विरुध्द कोर्टात चार्जशिट केले होते. 

   त्यात सरकारपक्षातर्फे एकुण ७ साक्षीदारांचा साक्षीपुरावा नोंदविण्यात आला..    सदर खटल्यात सरकारी वकील म्हणुन व्हि.डी.मोतीवाले यांनी भक्कमपणे सरकारपक्षाची बाजु मांडून तसेच अभ्यास पुर्ण  युक्तिवाद केल्याने, दोन्हीही आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द होवुन, दि.०६/०५/२०२२ रोजी मुख्य प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी.खराटे मॅडम यांनी भारतीय दंड संहीता कलम ३७९सह ३४ अन्वये दोघेही आरोपीना प्रत्येकी एका वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपयेची दंडाची शिक्षा सुनावली.तसेच सदर कोर्टाने आजच ट्रॅक्टर  चोरीच्या दुसरे खटल्यात एका आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने,एका वर्षाची साधा कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला.त्याची हकिगत अशी आहे की,दि.०४/११/२०१८ चे २०.०० ते ०५/११/२०१८ चे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान मौजे भडगांव येथे शासकीय विश्रामगृहाचे मोकळ्या जागेवरुन महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर दंंड न भरता व महसूल विभागातील कोणत्याही कर्मचारीची संमती न घेता,लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले म्हणुन फिर्यादी तलाठी योगेश लक्ष्मण ब्राम्हणे यांनी आरोपी चेतन सुभाष सोनवणे रा.भडगाव याचे विरुध्द भडगांव पो.स्टे.ला फिर्याद दिली.त्याचा गु.रं.नं.१५०/२०१८ भा.दं.वि.क.३७९ असा असुन,त्याचा तपास स.फौ.भास्कर पुंडलिक बडगुजर यांनी करुन,चार्जशिट कोर्टात दाखल केला होता. 


सदर खटल्यात सात साक्षिदारांची साक्ष स्वता:हा मोतीवाले सरकारी वकीलांनी घेतली.व आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने,न्यायालयाने त्यास एका वर्षाची शिक्षा व दोन हजार रूपये दंड केला

author avatar
टीम जळगाव लाईव्ह