जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | 1987साली मुंबई येथील विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु होती. या निवडणुकीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुसलमानांविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल. हे भाषण इतक गाजल कि, शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांचा विजय झाला. मात्र मुसलमानांविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्ष मतदान करण्यापासून रोखण्यात आलं होतं.
तर झालं असं होतं 1987 झाली विलेपार्लेच्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एका बाजूने काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे तर दुसऱ्या बाजूने अपक्ष उमेदवार रमेश प्रभू निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रभू यांचा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचार केला होता. बाळासाहेबांनी प्रभूंना समर्थन दिलं होतं. 13 डिसेंबर 1987 राजी मतदान झालं व दुसऱ्या दिवशी निकाल लागला यावेळी काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे पडले तर रमेश प्रभू यांचा दणदणीत विजय झाला.
पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे कोर्टात गेले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांवर खटला भरला. बाळासाहेबांनी रमेश प्रभूंना जिंकवण्यासाठी प्रक्षोभक भाषण केल्याने. लोकप्रतिनिधी कायदा नुसार निवडणूकीत भ्रष्ट पद्धतीचा वापर केल्याचा आरोप बाळासाहेबांवर निश्चित करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका प्रभु यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली. 11 डिसेंबर 1995 सली न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. कोर्टाने निकाल देताना म्हटलं होतं की , बाळासाहेब ठाकरे यांनी 31 नोव्हेंबर 9 डिसेंबर 10 डिसेंबर 1988 रोजी भाषणे केली ती प्रक्षोभक होती.
त्याच एका सभेत बाळासाहेब म्हटले होते. आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाहीये हा देश हिंदूंचा आहे. आणि तो त्यांचाच राहणार. यामुळे बाळासाहेबांना तो 1995 ते 2001 या कालावधीत मतदानापासून वंचित राहावं लागलं.