⁠ 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जि.प.ने जिंकली न्यायालयीन लढाई, मुदत संपलेले १८ गाळे घेतले ताब्यात

जि.प.ने जिंकली न्यायालयीन लढाई, मुदत संपलेले १८ गाळे घेतले ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ ।  जिल्हा परिषदेच्या मालकीचे मुदत संपलेले १८ गाळे आज गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या पथकाने केली.

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषद अल्पबचन भवनात असलेले १८ गाळे हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. सन २००३ पासून जि.प.मालकीचे १८ गाळे अनाधिकृतपणे गाळेधारकांनी ताब्यात ठेवले होते. या गाळ्यापोटी जिल्हा परिषदेला भाडे सुद्धा देत नव्हते आणि गाळे खाली करीत नव्हते. याबात वारंवार सूचना देवूनही गाळेधारक दाद देत नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. 

यासंदर्भात जि.प.न. न्यायालयात दावा करीत न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाला दिला होता. जिल्हा परिषदेने कायदेशिर लढाई जिंकूनही गाळेधारक जुमानत नसल्याने जि.प.ने पोलीस बंदोबस्तात १८ गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

यांनी केली कारवाई

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कार्यकारी अभियंता नंदकुमार पवार, गटविकास अधिकारी एस बी सोनवणे, जिल्हापरिषदेचे कायदेशीर सल्लागार  अँड. हरुल देवरे, कर्मचारी व पोलिस बंदोबस्त यांच्यासह गाळे ताब्यात कारवाई केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.