जळगाव जिल्हा

जि.प. मुख्याधिकाऱ्यांचा भन्नाट फंडा, सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन देण्याचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जिल्हा परिषदेचा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन साठी वणवण भटकावे लागू नये म्हणून सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याला पेन्शन आदेश ( पीपीओ ) देण्याची अभिनव संकल्पना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांचे हस्ते पेन्शन आदेश देऊन सन्मानित करण्यात आले .


जिल्हा परिषदेत अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिवशी संबधित कर्मचाऱ्याला गोड बातमी देऊन सुखदः धक्का देण्याची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी सुरु केली आहे. मंगळवार दि. ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या समाजकल्याण विभागातील समाजकल्याण निरीक्षक डी .एस. पाटील , महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक रवींद्र भागवत पाटील , परिचर अनिल विठ्ठल चाटे , शिक्षण विभागातील ग्रेडेड मुख्याध्यापक छगन कडू पवार , उपशिक्षक गोकुळ विठ्ठल सोनवणे , उपशिक्षक बाळकृष्ण रामा ठोसर, वरिष्ठ सहाय्यक सुचिता धनंजय भिरूड,आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यिका कल्पना लक्ष्मण गायकवाड यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते (पीपीओ) पेन्शन आदेश देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत ,शिक्षणधिकारी विकास पाटील, समाजकल्याण अधिकारी श्री. रायसिंग , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . बी.टी . जमादार ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . प्रमोद पांढरे , प्रशासन अधिकारी डॉ. मनोहर बावणे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुण बागुल , साकिब शेख , महिला बालविकास विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अजय पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदू पाटील, शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे यांचेसह इतर उपस्थित होते . निवृत्तीच्या दिवशीच आयुष्यभराची शिदोरी असलेला पेन्शन आदेश हातात मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . या वेळी सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ . मधुकर तोडसाम यांचाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .


फोटो ओळ – १) सेवानिवृत्त समाजकल्याण निरीक्षक डी .एस . पाटील यांना पीपीओ देऊन सन्मानित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया सोबत समाजकल्याण अधिकारी श्री. रायसिंग व इतर २) शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना पीपीओ देऊन सन्मानित करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया ,सोबत शिक्षणाधिकारी विकास पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे व इतर .

Related Articles

Back to top button